गरजूंचे चालते-फिरते एटीएम म्हणजे शेळीपालन - भिकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:54 AM2020-12-04T04:54:20+5:302020-12-04T04:54:20+5:30
पातूर तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या सभागृहामध्ये गुरुवारी महिला आर्थिक विकास महामंडळाने आयोजित केलेल्या आधुनिक शेळीपालन या विषयावरील एक ...
पातूर तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या सभागृहामध्ये गुरुवारी महिला आर्थिक विकास महामंडळाने आयोजित केलेल्या आधुनिक शेळीपालन या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रांमध्ये डॉ. भिकाने बोलत होते.
डॉ. भिकाने यांनी शेळी हा प्राणी कोणत्याही अडचणीला कामात येतो. घरातील मुलांचे शिक्षण असो कुटुंबातील कोणाच्या आजारावर उपचार करण्यासाठी तातडीने पैसे उपलब्ध होतात. शेळी झाडपाला खात असल्यामुळे वृक्षांची संख्या वाढवून जंगल निर्माण करण्यासाठी मदत होते. दर्जेदार शेणखत निर्माण होते. गायीच्या दुधानंतर शेळीचे दूध औषधी गुणयुक्त आहे. त्याबरोबरच क्षयरोगासारखे आजार बकरीच्या सहवासाने दूर होतात, असे सांगितले जाते. अशी विस्तृत माहिती यावेळी कार्यक्रमाचे चर्चासत्राचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता ए .डब्ल्यू. भिकाने यांनी दिली.
कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे होत्या. त्यांनी शेती हा निसर्गावर अवलंबून व्यवसाय आहे; मात्र कोंबड्या-बकऱ्या गायी-म्हशी नियमित रोजगार देतात. त्यामुळे गरिबांसह मध्यमवर्गीय तथा शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत होते. एखादवेळी शेतीत उत्पन्न कमी झाले तर हा व्यवसाय शेतीचा तोटा भरून करण्यात मदत करतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी पशुसंवर्धन सहायक उपायुक्त डॉ. उन्हाळे, पातूर सीएमआरसीच्या मीना, वर्षा अंभोरे, शरद शिरसाठ, योगिनी, उज्ज्वला सुरवाडे, चंद्रशेखर अंभोरे उपस्थित होते.
पातूर शहरातील तथा ग्रामीण भागातील महिलांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. संचालन डॉ. के.वाय. देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पातूर तालुका महिला आर्थिक विकास महामंडळ तथा तालुका लघू पशू सर्व चिकित्सालयच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
फोटो: