गो मांस जप्त; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 02:41 AM2017-01-08T02:41:34+5:302017-01-08T02:41:34+5:30
अडगाव येथील घटना.
हिवरखेड (अकोला), दि. ७- पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अडगाव येथील कसाबपुरा येथे हिवरखेड पोलिसांनी ७ जानेवारी रोजी धाड टाकून ३१ हजार रुपयांचे गोमांस जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अडगाव बु. येथील शे. फरीद शे. नजीर याच्या कसाब पुर्यातील निवासस्थानी गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलिसांनी ७ जानेवारीला सकाळी ७ वाजता छापा मारला.
यावेळी त्याच्या घरात गोमांस १५0 किलो (किंमत ३१ हजार रुपये) मिळून आले. मांस पोलिसांनी जप्त केले. ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या तक्रारीवरून शे. फरीद शे. नजीर व त्याचा सहकारी शे.इरफान शे.मुसा यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा १९९५, कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई ठाणेदार कात्रे, पीएसआय शरद भस्मे, पोलीस पथकाने केली.