उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार!

By Atul.jaiswal | Published: April 1, 2024 01:23 PM2024-04-01T13:23:02+5:302024-04-01T13:23:22+5:30

विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. 

Go to Goa from Akola in summer, Nagpur-Madgaon Express will run till the end of June! | उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार!

उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार!

अकोला : विदर्भातील प्रवाशांना गोव्याची वारी घडविणाऱ्या नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली असून, अकोलामार्गे धावणारी ही गाडी आता ३० जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार आहे. या गाडीला अकोल्यात थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. 

गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. गाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २९ जून २०२४ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५४ फेऱ्या होणार आहेत.

...असे आहे वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (०११३९) ही द्विसाप्ताहिक गाडी ३ एप्रिल ते २९ जून पर्यंत नागपूर स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी दुपारी ३:०६ मिनिटांनी सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५:४६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-नागपूर एक्स्प्रेस (०११४०) ही द्विसाप्ताहिक गाडी ४ एप्रिल ते ३० जून पर्यंत दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री ०८:०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०२१:३१ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.

कोणत्या स्थानकांवर थांबा?
नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम (गोवा) तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे.
 

Web Title: Go to Goa from Akola in summer, Nagpur-Madgaon Express will run till the end of June!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.