देवा... पुढच्या वर्षी तरी पंढरीची वारी घडू दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:36+5:302021-07-20T04:14:36+5:30
वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा पंढरपूर वारीचा योग पहिल्यांदाच २६ वर्षांपूर्वी संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या माध्यमातून आला. ...
वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा
पंढरपूर वारीचा योग पहिल्यांदाच २६ वर्षांपूर्वी संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या माध्यमातून आला. तेव्हापासून एकही वर्ष न चुकता पंढरपूर वारी केली. मागील १५ वर्षांपासून रुद्रायणी चिंचोली येथून निघणाऱ्या वैकुंठवासी नामदेव महाराज मोरे यांच्या पालखी मंडळासोबत पंढरपूरची वारी होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही वारीत खंड पडल्याने मन दु:खी झाले. वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय आहे. वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ती अशी मोडणे योग्य नाही. शासनाने नियमावली दिली असती, तर नक्कीच यंदाची वारी समाजासाठी दिशादर्शक ठरली असती.
- ज्ञानेश्वर महाराज सोळंके, मोरगाव सादिजन
३८ वर्षात दुसऱ्यांदा वारीत खंड पडला, मन दु:खी झालं
वयाच्या १४व्या वर्षीपासूनच वारकरी सांप्रदायात आहे. ३८ वर्षांपूर्वी गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली. पायी वारीतूनच पहिल्यांदा पंढरपूर पाहिलं होतं. तो आनंद शब्दात मांडता येणार नाही. वाहनाने जाणे याला वारी म्हणता येणार नाही, तर पायी जाण्यालाच वारी म्हणता येते. आषाढी एकादशी कधी येते, हीच प्रतीक्षा वारकरी एक एक दिवस आतुरतेने करतो. यंदा मात्र सलग दुसऱ्या वर्षी वारी खंडित झाली. मागील ३८ वर्षात दुसऱ्यांदा वारीत खंड पडल्याने मन दु:खी झाले. वारकरी सांप्रदाय स्वत: शिस्तप्रिय आहे. शासनाने नियम घालून दिले असते, तर त्याचे पालन करून वारी झाली असती. पाऊस पडला की, शेतकऱ्यांना जसा आनंद होतो, तसेच वारी आली की, वारकरी आनंदी होतो.
- काशीनाथ महाराज फोकमारे,