सत्ता स्थापनेसाठी पुन्हा भगवी ‘युती’?

By admin | Published: February 22, 2017 02:46 AM2017-02-22T02:46:00+5:302017-02-22T02:46:00+5:30

जनमताचा कानोसा; भाजपला सर्वाधिक जागा

Goddess again for establishment of power? | सत्ता स्थापनेसाठी पुन्हा भगवी ‘युती’?

सत्ता स्थापनेसाठी पुन्हा भगवी ‘युती’?

Next

अकोला, दि. २१- महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने युती किंवा आघाडी न करता निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणे पसंत केले. या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. ह्यलोकमतह्ण च्या दहा बातमीदारांच्या चमूने मंगळवारी दिवसभर शहरातील २0 प्रभाग पिंजून काढले. मतदानासाठी येणार्‍या मतदारांचा कानोसा घेतला असता भाजपला पहिली पसंती दर्शविण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक आहे.
अकोलेकरांचा कल पाहता भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा देणारा असला तरी महापालिकेत सत्तास्थापनेच्या घडामोडी करताना भाजपला मित्र पक्षाची गरज भासणार असल्याचेही चित्र या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
महापालिका क्षेत्रातील २0 प्रभागांमधील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळ होईपर्यंंत ५५.९१ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास येणार असल्याचे संकेत आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाचा क्रमांक लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेत सुद्धा दोन विविध संस्थांनी केलेल्या ह्यएक्झीट पोलह्ण मध्ये भाजपा किंवा सेनेला बहूमत मिळणार नाही असा अंदाज वर्तविला गेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये युती झाली तर तेच सुत्र राज्यभर लागु करून अकोल्यातही युतीची गठण होऊ शकते. तसे न झाल्यास नवे राजकीय समिकरण उदयास येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अकोला महापालिक ा निवडणुकीच्या संदर्भात राज्य शासनाकडे पाठविलेल्या अहवालातसुद्धा भाजप व शिवसेनेच्या जागा वाढणार असल्याचे नमूद केल्याची माहिती आहे.
दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढविणार्‍या सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मतदारांचा कौल आपल्यालाच मिळेल, अशी आशा पक्षाच्या नेत्यांना असली तरी मतदानाच्या नंतर मात्र पक्षपातळीवरही निकालाचा अंदाज घेतला जात आहे. कुठल्या प्रभागात कुणाचा प्रभाव राहीला, वेळेवर कोणती समिकरणे बदलली यासंदर्भात शाहनिशा करुन राजकीय पक्ष आपआपले अंदाज काढण्यात गुंग झाले आहेत.

Web Title: Goddess again for establishment of power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.