‘एमआयडीसी’त  गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:27 AM2017-10-25T01:27:32+5:302017-10-25T01:27:52+5:30

अकोला : औद्योगिक वसाहतीत एम. आर. फर्निचर मॉलच्या  मागे असलेल्या वर्कशॉपला मंगळवारी दुपारी ३ वाजता आग  लागल्याची घटना घडली. वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ठिणगी पडून ही  आग लागल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

Goddess fire in MIDC | ‘एमआयडीसी’त  गोदामाला आग

‘एमआयडीसी’त  गोदामाला आग

Next
ठळक मुद्देआगीत  दोन ते तीन दुचाक्या व वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक  झाले. तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : औद्योगिक वसाहतीत एम. आर. फर्निचर मॉलच्या  मागे असलेल्या वर्कशॉपला मंगळवारी दुपारी ३ वाजता आग  लागल्याची घटना घडली. वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ठिणगी पडून ही  आग लागल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत  दोन ते तीन दुचाक्या व वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक  झाले. एकूण तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे.
मनोज वोरा यांच्या मालकीच्या अरिहंत एंटरप्रायजेसचे  एमआयडीसीत गोदाम असून, मंगळवारी दुपारी ३ वाजता या  गोदामातील साहित्याला आग लागल्याची माहिती मिळताच  अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना  झाल्या. त्यांनी वर्कशॉपमधील आगीवर नियंत्रण मिळविले. ये थील अरिहंत एंटरप्रायजेसचे फर्निचर मॉल असून, त्याचे मालक  मनोज वोरा आहेत. दोन अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग  आटोक्यात आणली. 

Web Title: Goddess fire in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग