रुग्णालयात जातोय; अंत्यसंस्काराला जातोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:28+5:302021-04-26T04:16:28+5:30
--बॉक्स-- रविवारी शुकशुकाट प्रवासी संख्या कमी असल्याने दैनंदिन केवळ १०-११ बसेस बसस्थानकातून सुटत आहे; मात्र रविवारी बसस्थानकात प्रवासी नसल्याने ...
--बॉक्स--
रविवारी शुकशुकाट
प्रवासी संख्या कमी असल्याने दैनंदिन केवळ १०-११ बसेस बसस्थानकातून सुटत आहे; मात्र रविवारी बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट पहावयास मिळाला. बसेसची संख्या कमी करून फक्त सहा बसेस सोडण्यात आल्या. यामध्येही प्रवासी संख्या कमी होती.
--बॉक्स--
प्रवासी घालतात वाद
एसटी बसची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे; मात्र अनेक प्रवासी हे खासगी कारणानिमित्त प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस त्यांना विचारणा केल्यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत आहेत.
--बॉक्स--
होमगार्ड व पोलिसांचा कडा पहारा
बसस्थानकामध्ये प्रवासी वारंवार वाद घालत असल्याने बसस्थानकात होमगार्ड व पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेत न बसणाऱ्या प्रवाशांना समजविण्यासाठी बस चालक-वाहकाला या होमगार्डची मदत घ्यावी लागत आहे.
--बॉक्स--
लांब पल्ल्याच्या बसेस बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महामंडळाकडून शहरातील बसस्थानकातून पुणे, मुंबई, नागपूर, धुळे या लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.