काळविटाच्या शिंगांसह सागवान जप्त

By admin | Published: July 1, 2014 09:43 PM2014-07-01T21:43:31+5:302014-07-03T20:28:47+5:30

माजी सैनिकास न्यायालयीन कोठडी

The goldsmith with the blackvita seized | काळविटाच्या शिंगांसह सागवान जप्त

काळविटाच्या शिंगांसह सागवान जप्त

Next

आकोट: आकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्र असलेल्या जंगलामधून सागवान वनसंपत्तीची तस्करी करणार्‍या माजी सैनिकाला वनविभागाच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याजवळून काळविटाच्या ६ शिंगांसह सागवान जप्त करण्यात आले आहे. या आरोपी माजी सैनिकावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आकोट वन्यजीव विभागात माजी सैनिकांना वनरक्षणाकरिता ठेवण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील शेख इसराईल शेख इस्माईल (वय ५३) या माजी सैनिकाला बोरव्हा परिसरात ठेवण्यात आले होते; परंतु आरोपी शेख इसराईल शेख इस्माईल हा सागवानची तस्करी करीत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. अखेर २७ जूनला रात्री रेल्वेने सागवान लाकडाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आला. आरोपी हा आकोटला रेल्वेने वनसंपत्ती आणून मालवाहू वाहनाने अंजनगाव सुर्जी येथे आपल्या घरी नेत असल्याचे उघड झाले. आरोपीजवळून घटनास्थळावर २ हजार रुपये किमतीचे सागवान व त्याच्या घरामधून काळविटाच्या ६ शिंगांसह पाच हजार रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले. सदर कारवाई उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मालवीय यांनी १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी वनविभागाचे विशेष अभियोक्ता मनीष जेस्वाणी यांनी बाजू मांडली. आकोट रेल्वेने वनसंपत्तीची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या वनतस्करीमागे अजून कोण-कोण आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. 

Web Title: The goldsmith with the blackvita seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.