पिंजर महावितरण कंपनीचा गलथान कारभार, सातत्याने वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:54+5:302021-04-07T04:18:54+5:30

जिल्ह्यात कुठेच नाही, एवढ्या तक्रारी पिंजर महावितरण कंपनीच्या करण्यात येत आहेत. तक्रारीतूनच दोन अधिकाऱ्याचे निलंबन झाले. पिंजर येथे ...

Golthan management of Pinjar MSEDCL, continuous power outage | पिंजर महावितरण कंपनीचा गलथान कारभार, सातत्याने वीज पुरवठा खंडित

पिंजर महावितरण कंपनीचा गलथान कारभार, सातत्याने वीज पुरवठा खंडित

Next

जिल्ह्यात कुठेच नाही, एवढ्या तक्रारी पिंजर महावितरण कंपनीच्या करण्यात येत आहेत. तक्रारीतूनच दोन अधिकाऱ्याचे निलंबन झाले. पिंजर येथे ३३ केव्ही केंद्र असून परिसराला ६४ खेडेगाव जोडले आहेत. पिंजर गावाची लोकसंख्या १८ हजार आहे. परंतु येथे दररोज वीज पुरवठा खंडित होतो. अभियंत्यांनी येथे एबी स्विच बसविले नाहीत. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. प्रत्येक डीपीवर एबी स्विच बसविले तर वीज पुरवठा खंडित होत नाही. परंतु अभियंता बानमोटे एबी स्विचचा प्रस्ताव तयार करायला तयार नाहीत.

पिंजर येथील वीज पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात आली. पिंजर येथे एबी स्विचची प्रक्रिया सुरू करून समस्येचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करू.

-विजय कासट, कार्यकारी अभियंता, महावितरण

पिंजर येथे सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. येथे कायमस्वरूपी अधिकारी नाही. दररोज तासनतास पुरवठा खंडित होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.

-प्रवीणकुमार जयस्वाल, माजी सरपंच, पिंजर

Web Title: Golthan management of Pinjar MSEDCL, continuous power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.