अकोला जिल्ह्यात ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:28 PM2019-12-20T14:28:27+5:302019-12-20T14:28:43+5:30
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय निर्मितीची मोहीम राबवण्यात आली. बेसलाइन सर्व्हेमध्ये नाव नसल्याने अनेक गावातील कुटुंब वंचित आहेत. आता सर्वच गावांतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थींनी तातडीने शौचालयाच्या अनुदानाची मागणी करून ते पूर्ण करावे. ३१ डिसेंबरनंतर अनुदान बंद होणार आहे. त्याचवेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे. त्यामुळे पथक केव्हाही गावात धडकण्याची शक्यता आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यासाठी ३,८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी तयार झाली.
लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात आले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करणे, रोजगार सेवकासोबत समन्वय ठेवून काम करावे, ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. आता शौचालयांसाठी मिळणारा निधी ३१ डिसेंबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना शौचालय बांधकाम करावयाचे आहे, त्यांनी निर्मितीसाठी पुढे यावे.
बेसलाइन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करणे, त्यापैकी वैयक्तिक शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांना शौचालय बांधकामाचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. त्याचा लाभ वंचित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय, आता उघड्यावर शौचास जाणाºयाविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पथक पुन्हा सक्रिय केल्याचे स्वच्छ भारत मिशन कक्षाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.