गाेपाल अग्रवाल हत्याकांड : लुटलेली रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:21 AM2021-01-01T10:21:59+5:302021-01-01T10:29:24+5:30
Gopal Agarwal murder case : आराेपींनी दिलेल्या माहितीवरून हत्याकांड वेळी लुटलेली रक्कम स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी जप्त केली.
अकाेला : बाेरगाव मंजू येथील संजय स्टाेन क्रशरचे व्यवस्थापक गाेपाल अग्रवाल यांची सागर काेठाळे व त्याच्या साथीदारांनी गाेळ्या झाडून २६ डिसेंबर राेजी हत्या केल्यानंतर पाेलीस काेठडीत असलेल्या आराेपींनी दिलेल्या माहितीवरून हत्याकांड वेळी लुटलेली रक्कम स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी जप्त केली.
अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर २६ डिसेंबर रोजी रात्री गिट्टी खदान व्यावसायिक व संजय स्टोन क्रशरचे मालक संजय अग्रवाल यांचे चुलत भाऊ गोपाल हनुमानप्रसाद अग्रवाल (४५, रा. खोलेश्वर) यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. या हत्याकांडाचा तपास करताना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वातील पथकाने चार आराेपींना शोधून काढण्यात त्यांना यश आले. मुख्य आरोपी सागर कोठाळे, विजय अंबादास राठोड (२४, रा. कातखेडा), लखन वसंता राठोड (२१, रा. कुंभारी), रणधीर भारत मोरे (२३, ता. राहुलनगर, शिवणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या आराेपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ जानेवारी २०२० पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. घटनेत लुटलेले दीड लाख व खुनासाठी वापरण्यात आलेल्या देशी कट्ट्याचा पोलीस शोध घेत असतानाच लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर देशी कट्टा जप्त करण्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.