‘ओबीसी’ आरक्षणासाठी गोर सेनेचे साखळी उपोषण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:55+5:302021-08-18T04:24:55+5:30
अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’चे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करण्यासह विविध मागण्यांसाठी गोर सेना ...
अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’चे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करण्यासह विविध मागण्यांसाठी गोर सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्यात यावे, आदी विविध मागण्यांसाठी गोर सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणात गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष रतन आडे यांच्यासह सुनील जाधव, सेवक राठोड, अशोक चव्हाण, कृष्णा चव्हाण, मनोहर राठोड, शालीकराम राठोड, शिवराज जाधव, आदी सहभागी झाले आहेत.
....................फोटो.................