गोरेगाव किडनी प्रकरण; युद्धपातळीवर सर्व्हे सुरू

By admin | Published: May 18, 2014 12:40 AM2014-05-18T00:40:36+5:302014-05-18T00:50:28+5:30

अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बु. आरोग्य तपासणी शिबिरात ३९ संशयित किडनी रुग्ण आढळून आलेत. तर हायड्रोसीलचे ११ रुग्ण समोर आले.

Goregaon Kidney Case; Surviving the Survivor at the Battlefield | गोरेगाव किडनी प्रकरण; युद्धपातळीवर सर्व्हे सुरू

गोरेगाव किडनी प्रकरण; युद्धपातळीवर सर्व्हे सुरू

Next

अकोला - अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बु. येथील किडनी व हायड्रोसील आजाराची समस्या ह्यलोकमतह्णने उघड केल्यानंतर जिल्हा व आरोग्य प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. १६ मे २0१४ रोजी गोरेगावात आरोग्य विभागाचे १२ सदस्यांचे पथक दाखल झाले. सकाळपासून वैद्यकीय अधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली तर काहींना ग्रामपंचायत कार्यालयात तपासण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणी शिबिरात गावात ३९ संशयित किडनी रुग्ण आढळून आलेत. तर हायड्रोसीलचे ११ रुग्ण समोर आले. हायड्रोसील व हर्निया या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत; परंतु हा आजार उघड करायला कोणी तयार नाही. अंडकोष वृद्धी या आजारामुळे येथील शेकडो तरुणांचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आले आहे. गावात क्षारयुक्त पाणी असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात किडनी आणि पत्री सारखा आजार बळावला आहे. लहान मुलेसुद्धा यातून सुटले नाहीत. या जीवघेण्या समस्येला वेळीच आळा घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता गावकर्‍यांनी वर्तविली आहे. लोकमत प्रतिनिधीने घरोघरी जाऊन रुग्णांची पाहणी केली असता मोठय़ा प्रमाणात किडनी आणि हायड्रोसीलच्या आजाराचे रुग्ण आढळले. किडनी व हायड्रोसील आजाराने ग्रस्त रुग्ण खासगी डॉक्टरांकडून उपचार करू न घेत असल्याचेही गावकर्‍यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन अंबाडेकर यांच्या नेतृत्वात येथे १२ वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम येथे कार्य करीत आहे.यामध्ये डॉ. शंखपाळ, हिवताप अधिकारी डॉ.केसरी,डॉ. भुस्कुटे, परिचारिका श्रीमती खंडारे, ठाकरे, हनवते, पोटे, एम.व्ही.महल्ले, नागे, डी.एन.ताजने, टी.ए.ताजने,खंडारे व हिवताप कार्यालयाच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या पथकाने गावातील पाण्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Goregaon Kidney Case; Surviving the Survivor at the Battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.