शासकीस कापूस खरेदी २७ नोव्हेंबरला सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:03 AM2019-11-15T11:03:25+5:302019-11-15T11:03:42+5:30
खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून, उताराही घटल्याने खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक बघता, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात ४२ लाख हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यातच खासगी कपाशी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रतिक्ंिवटल ५ हजार ६०० रुपये दर देण्यात आले.परंतु कापूस भिजल्याने व्यापाºयांनी दर कमी केले असून, आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कपाशीची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.
या पृष्ठभूमीवर पणन महासंघाचे अध्यक्ष व संचालकांनी गुरुवारी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक व पणन सचिवांची भेट घेतली व कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यानंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला असून, राज्यात ४५ खरेदी केंदे्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी मात्र कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्याच्यावर आर्द्रता नसावी, ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार असल्याचे पणन महासंघाने जाहीर केले आहे.
२७ नोव्हेंबरपासून राज्यात ४५ शासकीय कापूस खरेदी केंद्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेला कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ८ ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार आहे.
- राजूभाऊ देशमुख,
अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.