शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:55 AM2020-01-01T10:55:15+5:302020-01-01T10:55:36+5:30
कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे.
अकोला: भारतीय (सीसीआय) कापूस महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे सुरू करण्यात आलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र १५ जानेवारी रोजी बंद होणार असल्याचे वृत्त आहे. यावर्षी हंगामाला उशीर झाल्याने कापूस वेचणीलाही उशीर होत आहे. कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्राची मुदत वाढवावी, अशी शेतकरी नेत्यांची मागणी आहे.
सीसीआय आणि पणन महासंघाने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले. गत दीड महिन्यात पणन महासंघाने ११ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, सीसीआयनेही पणनपेक्षा थोडा जादा कापूस खरेदी केला आहे. कापसाची आवक सुरू असून, पावसाची शक्यता असल्याने आवक वाढली आहे; परंतु पावसामुळे पणन महासंघाने काही कापूस खरेदी केंद्रं बंद ठेवण्यात आली आहेत. यात विदर्भातील कापूस खरेदी केंद्राचा समावेश आहे.
१५ जानेवारी रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करणार नाही. पावसामुळे विदर्भातील कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन महासंघाकडे कापूस आवक वाढत असून, आतापर्यंत ११ लाख क्ंिवटल कापूस शेतकºयांनी विकला आहे.
- अनंत देशमुख,
अध्यक्ष,
पणन महासंघ.