शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:54 PM2018-12-28T12:54:13+5:302018-12-28T12:54:50+5:30

अकोला: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, शेतकरी, शेतीच्या शाश्वत विकासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी केले.

 Government has implemented sustainable farming policy - Guardian Minister | शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री

शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री

Next

अकोला: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, शेतकरी, शेतीच्या शाश्वत विकासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी केले.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडागंणावर आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, २७ डिसेंबर रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. तसेच आमदार गोपीकिशन बाजोरिया,आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, कृषी विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.
शासनाने विविध योजनेसह शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन अमलात आणला. विविध योजनांचे पैसे शेतकºयांच्या खात्यात आता जमा होत आहेत. शेतकरी सक्षमपणे उभा राहावा, यासाठीचे हे निर्णय असून, आता गावागावात जाऊन विद्यार्थी, शेतकºयांना कौशल्य विकासासंदर्भात मार्गदर्शन, प्रशिक्षण देणार आहोत यासाठी ३०० कोटी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या शाश्वत शेती विकास योजनांची माहिती देताना त्यांनी ज्यांचा थेट शेतकºयांशी संबंध येतो असे सरपंच, अंगणवाडी सेविका, पटवारी, ग्रामसेवकांना कृषी विद्यापीठाने कृषी प्रदर्शनाचे निमंत्रण दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली.
खा. धोत्रे शेतकरी विश्वाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगताना, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून योजना तयार करण्याची गरज आहे. सध्या त्यादृष्टीने काम सुरू आहे, शेतकºयांनी प्रगत,आधुनिक तंत्रज्ञान बघून त्याचा शेतीत वापर करावा, या उद्देशाने कृषी प्रदर्शन भरविण्यात येते. प्रदर्शनातील तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी किमान एका-एका गावातून २५ शेतकरी यावे, ही अपेक्षा आहे. म्हणूनच ज्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले, तो उद्देश सफल होण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठाचा शेतकºयांशी जिव्हाळा असून, चालत नाही तर प्रत्यक्षात काम किती झाले हे महत्त्वाचे असल्याची कानटोचणी खासदार धोत्रे यांनी उद्घाटन कार्यक्रमात केली. डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधन, तंत्रज्ञानाचा आढावा अध्यक्षीय भाषणातून घेतला. डॉ. मानकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार राजेंद्र निकम यांनी मानले. दरम्यान, दरम्यान, प्रदर्शनात कृषी संशोधन व बचत गटांची दालने असून, अनेक दालने यावर्षी रिकामी आहेत.

 

Web Title:  Government has implemented sustainable farming policy - Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.