अकोला जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 10:57 IST2020-11-29T10:57:24+5:302020-11-29T10:57:32+5:30
Government hostels News समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आठ शासकीय वसतिगृहे बंदच आहेत.

अकोला जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे बंदच!
अकोला: जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या असल्या तरी, समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आठ शासकीय वसतिगृहे बंदच आहेत. वसतिगृहे सुरू करण्यासाठी वसतिगृहांच्या इमारती ताब्यात देण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयाने १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळांचे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. शाळांचे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असले तरी, समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आठ शासकीय वसतिगृहे अद्याप बंद आहेत. कोरोना काळात कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आठ शासकीय वसतिगृहांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. वसतिगृहांच्या इमारती अद्याप जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असल्याने, समाजकल्याण विभागाची जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे अद्याप सुरू करण्यात आली नाही. शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील आठ वसतिगृहांच्या इमारती समाजकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात याव्या, असा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. इमारती ताब्यात मिळाल्यानंतर समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.
शाळा सुरू झाल्याने समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आठ वसतिगृहे सुरू करण्यासाठी वसतिगृहांच्या इमारती समाजकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- एन.व्ही. काळे, अधीक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय.