शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:47 PM2019-09-21T13:47:08+5:302019-09-21T13:47:19+5:30

तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे.

 Government Moog procurment Center Not Opened! | शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला: मुगाचे हमीदर यावर्षी प्रतिक्विंटल ७५ तर उडिदाचे दर १०० रुपयांनी वाढविण्यात आले; परंतु शासकीय खरेदी केंद्र अद्याप उघडण्यात आले नाही. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी नोंदणी करण्याची तयारी करण्यात आली; पण प्रत्यक्षात खरेदी केव्हा होईल, याची तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी मुगाला प्रतिक्विंटल ६,९७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आले होते. यावर्षी हे दर ७ हजार ५० रुपये करण्यात आले आहेत. उडिदाचे हमीदर गतवर्षी ५,६०० रुपये होते. ते यावर्षी ५,७०० रुपये आहेत. मुगाच्या दरात ७५ तर उडिदाच्या हमीदरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली. असे असले तरी आजमितीस मुगाला बाजारात प्रतिक्विंटल ३,७०० ते सरासरी ४,६५० रुपयेच दर आहेत. या हमीपेक्षा हे दर २,४०० रुपयांनी कमी आहेत. उडिदाचे दरही प्रतिक्विंटल ४,००० ते सरासरी ४ हजार ९०० रुपये आहेत. हे दरही बाजारात ८०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे, तेव्हाच वाढलेल्या हमीदराचा शेतकऱ्यांना लाभ होईल; परंतु मागील काही वर्षांचा अनुभव बघता, शासकीय खरेदी केंद्र अद्याप तरी सुरू झाले नसल्याने आजमितीस बाजारात जे दर आहेत, त्याच दराने शेतकºयांना मूग व उडीद विकावा लागत आहे.
दरम्यान, जून महिन्यात वेळेवर पाऊस आल्यास या पिकांची पेरणी केली जाते. तथापि, पावसाच्या अनिश्चिततेमुळे मागील काही वर्षांपासून मूग व उडीद पिकाची पेरणी कमी झाली. उत्पादनही घटले आहे. यावर्षीही वेळेवर पाऊस न आल्याने मुगाचे क्षेत्र घटले असून, त्याजागी शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन पेरणी केली. नवीन मुगाची आवक बाजारात दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत सुरू होते; परंतु यावर्षी उशिरा बाजारात मूग विक्रीसाठी आला. दरम्यान, शुक्रवारी अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७८ क्ंिवटल आवक होती. उडिदाची केवळ ३२ क्ंिंवटल आवक होती.
- नोंदणीचे पोर्टल बंद
शासनाने मूग खरेदीसाठीची नोंदणी करण्याचा आदेश शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिला आहे. तथापि, पोर्टलच बंद पडले. असे असले तरी प्रत्यक्षात खरेदी केव्हा सुरू होईल, याची तारीखच निश्चित नाही.

 बाजारात सध्या मुगाची आवक सुरू असून, जास्तीत जास्त दर प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये आहेत. शासकीय खरेदी केंद्राची नोंदणी करण्यात शुक्रवारी सुरुवात करण्यात आली; पण खरेदी केव्हा करतील, हे सांगता येत नाही.
- शिरीष धोत्रे,
सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

Web Title:  Government Moog procurment Center Not Opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.