अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द! - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:36 PM2018-10-07T16:36:33+5:302018-10-07T16:38:18+5:30

खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

 Government for the overall development of Akola - Guardian Minister Dr. Ranjit Patil | अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द! - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द! - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next
ठळक मुद्देविकास निधीतून ९७ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले.खेळाचे मैदानही विकसित केले जाणार आहे, त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

अकोला: शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, या सर्व कामांसह शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जेष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्याकरीता शहरातील खुल्या भूखंडांचे सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. या माध्यमातून खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
तापडिया नगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाचे सौंदर्यीकरण करण्याकरीता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांच्या विकास निधीतून ९७ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले. त्यावेळी सदर क्रिडांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक हरिष अलीमचंदाणी, गिरीश गोखले, अशिष पवित्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, माजी जि.प. अध्यक्ष दादासाहेब मते, माजी नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. अनिरुध्द भांबुरकर, डॉ. प्रशांत वायाचाळ, दीपक मायी, आरती लढ्ढा, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उज्वल चोरे, स्वीय सहायक प्रवीण साखरे, शरद झामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, एक सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील खुले भूखंड सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाशी माझे लहानपणापासून नाते आहे, या क्रिडांगणाचे सुशोभिकरण करीत असताना जेष्ठांपासून ते मुलांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असे हे क्रिडांगण केले जाईल.२ शहरात सध्या सांस्कृतिक घडामोडींसाठी भव्य सांस्कृतिक भवन बांधण्याचे काम सुरु आहे, याच परिसरात एक खेळाचे कॉम्पलेक्स, महाजलतरण तलाव, खेळाचे मैदानही विकसित केले जाणार आहे, त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक गिरीष गोखले, डॉ. अशोक ओळंबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले, तर आभार अ‍ॅड अनुप देशमख यांनी मानले.

 

Web Title:  Government for the overall development of Akola - Guardian Minister Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.