शासनाने खरेदी खरेदी केलेल्या तुरीची डाळ मिळणार रेशन दुकानात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 01:48 AM2017-12-04T01:48:58+5:302017-12-04T01:51:18+5:30
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे.
राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ात सुरू झालेल्या तूर खरेदी केंद्रावर २६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंंत १ लाख ३९ हजार क्विंटल खरेदी झाली. संपूर्ण राज्यातील केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात आली. त्या तुरीची भरडाई करून डाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय शासनाने २८ नोव्हेंबर रोजी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून ही डाळ संबंधित जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी मागणी केल्या प्रमाणे दिली जाणार आहे.
पॉस मशीन नसल्यास मार्जिनमध्ये फटका
दुकानदारांनी तूर डाळीची विक्री प्रक्रिया पॉस मशीनद्वारे केल्यास त्यांना प्र ितकिलो १ रुपया ५0 मार्जिन दिली जाणार आहे. तर मशीनशिवाय वाटप केल्या जाणार्या डाळीसाठी केवळ ७0 पैसे दिले जाणार आहेत.
पणन महासंघ करणार पुरवठा
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून भरडाई केली जाईल. त्यानंतर संबंधित विभागाच्या जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या मागणीनुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी डाळीचा पुरवठा त्यांच्या गोदामातून करणार आहेत.