अकोला जिल्ह्यात तुरीची शासकीय खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:04 PM2020-02-07T15:04:13+5:302020-02-07T15:04:39+5:30
नोंदणी प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येत आहे.
अकोला : यावर्षी तूर काढणी हंगाम सुरू होताच जिल्ह्यातील तीन तालुक्यांत शासकीय तूर खरेदी व नोंदणी केंद्र गुरुवारी सुरू करण्यात आली असून, उर्वरित खरेदी केंद्र उद्या ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात प्रति हेक्टर ९ क्ंिवटल ६६ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जाणार आहे.
तूर खरेदीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात तूर विक्री करावी लागते. तथापि, यावर्षी तूर काढणी हंगाम सुरू होताच आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, त्यांना २५ प्रमाणे मोबाइलद्वारे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. तुरीला यावर्षी प्रति क्ंिवटल ५,६०० ते ५,८०० रुपयेप्र्र्रमाणे हमीदर मिळणार आहेत. गुरुवारी विदर्भ को-आॅप मार्केटिंग फेडरेशनद्वारे अकोला, अकोट व मूर्तिजापूर येथे तीन खरेदी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित खरेदी केंद्र महाराष्टÑ को-आॅप फेडरेशन सुरू करणार आहे. नोंदणी प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आजमितीस ८ हजार ३ शेतकºयांनी तुरीची नोंदणी केली असून, अकोला तालुक्यात १,७०५ क्ंिवटल नोंदणी करण्यात आली आहे. अकोटला १,१८१, मूर्तिजापूर ८३६ क्ंिवटल, तेल्हारा १ हजार २०, बाळापूर १ हजार १९०, पातूर ५७१ तर पारस येथे १ हजार ५०० नोंदणी झाली आहे.
तीन तालुक्यांत तूर नोंदणी व खरेदी सुरू करण्यात आली असून, उद्या शुक्रवारी उर्वरित तालुक्यात खरेदी सुरू करण्यात येणार आहे. नोंदणी प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत केली जाणार आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था