मूग खरेदीचा होणार वांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:07 AM2019-08-22T10:07:09+5:302019-08-22T10:07:18+5:30
शासकीय मूग खरेदीचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अकोला : मुगाचा काढणी हंगाम सुरू झाला; परंतु शासकीय मूग खरेदीचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजमितीस प्रतिदिन ३० क्ंिवटल मुगाची आवक सुरू आहे.
राज्यात यावर्षी २ लाख ८४ हजार ७८८ हेक्टरवर मूग तर २ लाख ५७ हजार ७१५ हेक्टरवर उडीद पेरणी करण्यात आली आहे. तथापि, पावसाच्या अनिश्चिततेमुळे मूग पिकावर प्र्रतिकूल परिणाम झाला. मराठवाडा व विदर्भातील मुगाचे क्षेत्र पावसामुळे घटले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध होती, तेथील मुगाचा काढणी हंगाम सुरू झाला आहे. कोरडवाहू मूग येत्या आठ दिवसांत बाजारात येईल. या सर्व शेतकºयांची शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे; परंतु शासनाचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
- सुरुवातीला पाऊसच नसल्याने मुगाचे क्षेत्र कमी झाले असून, ज्यांनी पेरणी केली; पण उत्पादनाची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत हमीदर खासगी बाजारापेक्षा बरे असल्याने शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
मनोज तायडे,
जिल्हा समन्वयक,
शेतकरी जागर मंच,
अकोला.