शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:32 PM2019-04-03T15:32:00+5:302019-04-03T15:32:49+5:30

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती.

government should providing jobs to the unemployed! - Discuss with passengers with the bus | शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

googlenewsNext

- सचिन राऊत
अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती. मजबूत सरकार हवे; पण सर्वांना न्याय देणारे असावे असा या चर्चेचा सुर होत. अकोला ते मूर्तिजापूर या प्रवासादरम्यान विठ्ठलराव तायडे म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघात विकास सुरू आहे; मात्र रस्ते अनेक गावात पाण्याची सुविधा अद्यापही नसल्याचे सांगितले, तर अंकुश गावंडे यांनी मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे केवळ देशातील जनतेला त्रासच झाला आहे. शेतकरी व गोरगरिबांसाठीच्या योजनेच्या त्यांच्यासह राज्य सरकारने केवळ भूलभुलय्या केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही पूर्णपणे मिळाली नसून, अभ्यास करणारे हे सरकार आता राज्यात नको असल्याची प्रतिक्रिया दिली. याच बसमध्ये काही विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामधील प्रियंका खंडारे या विद्यार्थिनीने देशातील रोजगाराचा विषय प्रचंड गंभीर असून, सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सतीष खिरडकर यांनी मोदी सरकारने एकही नोकरी दिली नसून, राज्य सरकारनेही केवळ जाहिरात काढल्या; मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप एकाही बेरोजगारास झालेला नाही. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता वाद-विवाद आणि खोट्या घोषणा देणाºया सरकारपेक्षा वास्तविकतेमध्ये काम करणारे सरकार हवे असल्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.

काँग्रेस,भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू
काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले; मात्र त्यातही काही नेते काम करणारे असल्याने त्यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रत्येक सफरचंदाला कुठेना कुठे डाग असतो म्हणून आपण पूर्ण सफरचंद फेकून देत नाही, तर डाग असलेला भाग काढून इतर सफरचंद खाण्यासाठी वापरतो. राजकारणही याच प्रकारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

 

Web Title: government should providing jobs to the unemployed! - Discuss with passengers with the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.