शासकीय सोयाबीन खरेदी अनिश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:19 PM2018-10-27T13:19:22+5:302018-10-27T13:19:28+5:30
अकोला : शासकीय सोयाबीन खरेदीचे चित्रही यावर्षी अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे.
अकोला : शासकीय सोयाबीन खरेदीचे चित्रही यावर्षी अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे. दरम्यान, या आठवड्यात सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २,७०० ते ३,१०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकºयांना अल्पसा दिलासा मिळाला.हे दर हमीपेक्षा कमी आहेत.
मूग, उडिदाची शासकीय खरेदी दीड महिन्यानंतर मोजक्या ठिकाणी सुरू करण्यात आली. तेच सोयाबीनच्या बाबतीत होण्याची शक्यता शेतकºयांना वाटत असल्याने त्यांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे. शासकीय हमीदर प्रतिक्ंिवटल ३,३९० रुपये आहे; पण सोयाबीनचा काढणी हंगाम सुरू होऊनही अद्याप शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांना प्रतवारीनुसार
३,०० ते ६,००० रुपये कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे.
पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीही सोयाबीन पिकावर झाला असून, सरासरी एकरी उत्पादन चार क्विंटल आले आहे. बरड तसेच नदीकाठच्या जमिनीत हे उत्पादन एकरी एक ते दीड क्विंटलच असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे यावर्षी सुरुवातीला पाऊस पोषक ठरल्याने सोयाबीन पीक जोमाने वाढले; परंतु पीक फुलोºयावर येण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घ खंड दिल्याने बरड, नदीकाठची तसेच जेथे कमी पाऊस झाला, तेथे खूूपच कमी उतारा आला. बरड व नदीकाठच्या जमिनीत एक ते दीड क्विंटलच उतारा आला. भारी जमीन होती; पण पाऊस कमी झाला, तेथे एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा आला. भारी जमीन आहे, पाऊस बºयापैकी झाला, अशा ठिकाणी सोयाबीनचा उतारा एकरी ५ ते ८ क्विंटल आहे. म्हणजेच यावर्षी सुरुवातीला पीक चांगले असूनही पावसाने वेळेवर दगा दिल्याने सोयाबीन उत्पादनाचा उतारा काही ठिकाणी बºयापैकी तर बहुतांश ठिकाणी कमी आला आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन कमी झाले, तेथे शेतकºयांचा खर्चही यात निघणे कठीण आहे.