सरकारची फसवी कर्जमाफी : २५ फेब्रुवारीला भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:08 AM2020-02-23T11:08:51+5:302020-02-23T11:08:58+5:30
भाजप २५ फेब्रुवारी रोजी राज्यभरात आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अकोला: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारने फसवी कर्जमाफी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शिवाय, राज्यात महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. या निषेधार्थ भाजप २५ फेब्रुवारी रोजी राज्यभरात आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनासंदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा व महापौर अर्चना मसने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडीच्या प्रमुखांना या आश्वासनांचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी, सात-बारा कोरा करण्याच्या घोषणा देणाºया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री कुटे यांनी केला. ही फसवी कर्जमाफी असून, बहुतांश शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याउलट भाजप सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाउस, शेडनेट, शेती उपकरणांसह इतर जोड उद्योगांसाठीही शेतकºयांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांसोबतच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, गुन्हेगारांना धाक राहिला नाही. राज्यातील हे दोन गंभीर प्रश्न असून, त्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप जबाबदारी घेणार आहे. त्याची सुरुवात २५ फेब्रुवारी रोजी भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनापासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.