गावांच्या कारभाराची धुरा युवकांच्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:34 AM2017-10-10T02:34:12+5:302017-10-10T02:34:45+5:30

अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या म तदानाची सातही तालुक्यांमध्ये सोमवार,  ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी  निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांच्या भाग्याचा  फैसला करताना जनतेने प्रस्थापितांना हादरे दिले असून,  युवकांच्या हाती गावाची धुरा सोपविल्याचे चित्र समोर आले  आहे. 

Governments in the hands of the villagers! | गावांच्या कारभाराची धुरा युवकांच्या हाती!

गावांच्या कारभाराची धुरा युवकांच्या हाती!

Next
ठळक मुद्देअकोला जिल्हा : २७२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या म तदानाची सातही तालुक्यांमध्ये सोमवार,  ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी  निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांच्या भाग्याचा  फैसला करताना जनतेने प्रस्थापितांना हादरे दिले असून,  युवकांच्या हाती गावाची धुरा सोपविल्याचे चित्र समोर आले  आहे. 
जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींची  सार्वत्रिक निवडणूक घेण्यात  आली. उमेदवारी मागे घेण्याच्या  मुदतीपर्यंत जिल्हय़ात २७२ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचाय तींची निवडणूक अविरोध करण्यात आली. त्यामध्ये १७ सरपंच  आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ७७७ उमेदवारांची अविरोध  निवड करण्यात आली होती. आज लागलेल्या निकालांमध्ये थेट  सरपंच म्हणून निवडून आलेल्यांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक  आहे. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसली, तरी निकालानंतर  आता प्रत्येक पक्षाने आम्हीच बाजी मारली, असे दावे सुरू केले  आहेत. ग्रामीण जनतेने दिलेला कौल लक्षात घेतला, तर भाज पाला पसंती असल्याचे स्पष्ट होत असून, आतापर्यंत गावकारभार  करणार्‍या अनेकांना ग्रामस्थांनी धक्का देत नवख्या व युवकांच्या  हाती ग्रामपंचायतची धुरा सोपविली असल्याचे स्पष्ट झाले. 
अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ बाळापूर  हाच एकमेव विधानसभा मतदारसंघ भारिप-बमसंच्या ताब्यात  आहे.  त्यामुळे दिल्लीपासून सुरू झालेले भाजपाचे वारे गल्ली तही कायम असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत  निवडणूकीत सेना, काँग्रेस, भारिप-बमसंनेही सर्वाधीक ग्राम पंचायत जिंकल्याचा दावा केला आहे. 

ईश्‍वरचिठ्ठीचे दान
मूर्तिजापूर तालुक्यातील रामटेक येथील विद्या संदीप ठाकरे व  धोत्रा शिंदे येथील जायदाबी अहमद बेग हे दोघे ईश्‍वरचिठ्ठीने  सदस्य म्हणून विजयी ठरले. तर विरवाळा येथील नंदू मोटे हे  दोन मतांनी सरपंच म्हणून विजयी झाले. तेल्हारा तालुक्यातील  कोठा येथील मीराबाई मुंगुटराव अहेरकर, माळेगाव बाजार ये थील विजय हरिदास घोगळे व दापुरा येथील प्रीती प्रफुल्ल आढे  यांची ईश्‍वरचिठ्ठीने सरपंचपदी निवड झाली. 

थेट सरपंच निवडणूक घेवून भाजपा सरकारने ग्रामीण भागात  नवे पर्व सुरु केले आहे. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.  जिल्ह्यातील अध्र्याहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा झेंडा  फडकला आहे. हे यश केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे आहे. 
- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री 

थेट सरपंच निवडण्यात आल्याने कर्तबगार, धडाडीच्या कार्यक र्त्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी सरपंच  निवडण्याची सर्व प्रक्रिया ‘मॅनेज’असल्याने कर्तृत्ववान तरुणांना  वाव मिळत नव्हता. जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले  असून, त्याचे श्रेय जनतेला जाते. 
- खासदार संजय धोत्रे

सरपंच पदासाठी जनतेने तरुणांना संधी दिली. जाती-पातीच्या  राजकारणाचे दिवस जमा होण्याच्या मार्गावर असून, हे चांगले  संकेत आहेत. भाजपाला मिळालेला कौल पाहता जनता  आमच्या सोबत आहे, यात दुमत नाही. जिल्ह्यातून सर्वाधिक  उमेदवार पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 
-आमदार रणधीर सावरकर

जिल्ह्यातील १0४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या उमेदवारांनी  विजय मिळवला आहे. भाजपाने त्यांच्या उमेदवारांची यादी  नावासहित घोषित करावी, आम्ही तयार आहोत. भाजपा व भारि प-बहुजन महासंघाचे राजकारण पाहता जनतेने शिवसेनेला  कौल दिला आहे. 
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना

 जिल्ह्यातील ११0 ग्रामपंचायती भारिप-बमसंच्या ताब्यात  आल्या आहेत. काही सरपंचांनीही भारिप-बमसंसोबत  असल्याचे सांगितल्याने ही संख्या वाढणार आहे. जिल्ह्यातील  ५0 टक्के ग्रा.पं. पक्षाकडे आल्या आहेत. सरपंचासाठी पक्षाचे  प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. 
- काशीराम साबळे, कार्याध्यक्ष, भारिप-बमसं.

ग्रामीण भागात जनतेमध्ये भाजपाबद्दल प्रचंड चिड व संतापाचे  वातावरण आहे. त्यामुळेच जनतेने काँग्रेसच्या १५१ उमेदवारांना  विजयी केले असून काँग्रेसच्या ‘अच्छे दिना’ची ही सुरुवात  आहे.
-हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

Web Title: Governments in the hands of the villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.