सरकारचे शेतकरी हिताला प्राधान्य - तोमर
By admin | Published: June 12, 2016 02:34 AM2016-06-12T02:34:17+5:302016-06-12T02:34:17+5:30
बुलडाणा येथील पत्रपरिषदेत केंद्रीय पोलाद व खाद्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची माहिती.
बुलडाणा : केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून, विकासाची चाके गतीने फिरत आहेत. प्रत्येक वयातील, गटातील किंवा उत्पन्न र्मयादेतील नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करतील, अशा योजना केंद्र व राज्य सरकारने राबविल्या असून, शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद कृषी व कृषी संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी ठेवण्यात आली, अशी माहिती केंद्रीय पोलाद व खाद्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ११ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गतवर्षी प्रत्येक दिवसाला ९१ किलोमीटर ग्रामीण रस्त्याची निर्मिती करण्यात आल्याचे सांगत ना. तोमर म्हणाले, या योजनेमुळे देशात ३0 हजार ५00 किलोमीटर रस्ते तयार करण्यात आले आहेत. आपत्ती काळात महाराष्ट्राला मदत करताना केंद्र सरकारने कुठलाही आखडता हात घेतला नाही. एनडीआरएफ अंतर्गत केंद्र सरकारने राज्याला मागील दोन वर्षांत ५0 अब्ज १२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो आतापयर्ंत सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे कृषी मृदा आरोग्यपत्रिका वितरित करण्याचा मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी धडपड करणार्या युवकांना कर्ज वितरण करणे सोयीचे होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यात ३८ लाख ६ हजारपेक्षा जास्त छोट्या उद्योजकांना १४ हजार ३८0 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी अर्थसंकल्पात १ लाख कोटी रुपयांवरून १ लाख ८0 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही केंद्रीय मंत्री तोमर यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, आ.चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे आदींची उपस्थिती होते.