जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या बालकांना दिली गोवर-रुबेला लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:44 PM2018-11-28T17:44:19+5:302018-11-28T17:44:36+5:30
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा मुलगा आयमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची मुलगी नैनिका ...
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा मुलगा आयमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची मुलगी नैनिका यांना बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोवर-रुबेलाची लस देण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, त्यांची पत्नी डॉ. मानसाराव कलासागर, आयमानची आई तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. के.एस. घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांची उपस्थिती होती.
आयमान व नैनिकाला गोवर-रुबेलाची लस टोचल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले. गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा २७ नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात प्रारंभ झाला. पाच आठवडे चालणाºया या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस दिली जाणार आहे. जिल्हयातील सर्व शाळा, मदरसा येथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचाº्यांमार्फत बालकांना ही लस टोचली जात आहे. ही लस मोफत असून त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीसुध्दा लसीकरण केले जाते.
जिल्हयातील ९ महीने ते १५ वर्षाखालील सुमारे ४ लाख २७ हजार ८७२ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.