ग्रा.पं. सदस्यांना पहिल्यांदाच प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:28 AM2017-09-15T01:28:09+5:302017-09-15T01:28:30+5:30

जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.

G.P. Certificate for the first time! | ग्रा.पं. सदस्यांना पहिल्यांदाच प्रमाणपत्र!

ग्रा.पं. सदस्यांना पहिल्यांदाच प्रमाणपत्र!

Next
ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय राज्य निवडणूक आयुक्तांची माहितीऑनलाइन अर्जांमुळे अवैध ठरणार्‍या अर्जांचे प्रमाण कमी!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी अकोला दौर्‍यावर आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी थेट जनतेतून निवडणूक घेण्यात येत असल्याने, ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांमध्ये मतदारांना एक मतदान अधिक करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांसाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित करण्यात आली असून, मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर मतपित्रका लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मतपित्रकांचे रंग निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सरपंच पदांसाठी फिका निळा रंगाची मतपत्रिका राहणार आहे, तर सदस्य पदांसाठी एससी प्रवर्गाकरिता -फिका गुलाबी, एसटी प्रवर्गासाठी -फिका हिरवा, ओबीसी प्रवर्गासाठी -पिवळा आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या मतपित्रकांचा रंग पांढरा राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
येत्या डिसेंबरपर्यंत पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागेल. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) अभयसिंह मोहिते उपस्थित होते.

५0 टक्के जागा आरक्षित; महिला पुढे येतील!
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५0 टक्के जागा आरक्षित आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पुढे येतील, असा विश्‍वास राज्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात आचारसंहिता!
अकोला जिल्ह्यात एकूण ५३0 ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतींच्या म्हणजेच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने, निवडणुकांची आचारसंहिता जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. परंतु, जेथे निवडणूक नाही, तेथे विकास कामांवर आचारसंहितचे कोणतेही बंधन नसल्याचेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: G.P. Certificate for the first time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.