ग्रा.पं. निवडणुकीचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:00 AM2017-09-28T02:00:40+5:302017-09-28T02:03:26+5:30

वाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले असून, रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जाणार आहे.

G.P. The clear picture of the elections | ग्रा.पं. निवडणुकीचे चित्र स्पष्ट

ग्रा.पं. निवडणुकीचे चित्र स्पष्ट

Next
ठळक मुद्देसरपंच ४३0वित्त, बांधकाम विभागावर प्रश्नांचा भडीमार!तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांची माघार!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले असून, रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जाणार आहे.
आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. दरम्यान, २२ सप्टेंबरला झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण १0४ अर्ज बाद झाल्यानंतर ६0५८ अर्ज कायम होते. त्यापैकी बुधवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी  वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्य पदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले.
 कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली. 
दरम्यान, वाशिम तालुक्यातील सुराळा, साखरा, सोंडा या तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून, नागठाणा येथील सरपंच पदाची देखील अविरोध निवड झाली. मानोरा तालुक्यातील हातना, रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल, किनखेडा या ग्रामपंचायती अविरोध झाल्या; तर कारंजा तालुक्यातील लोहगाव, तारखेडा, वडगाव इजारा या ग्राम पंचायतींची निवडणूक अविरोध झाली असून ढंगारखेड, धनज खुर्द, धोत्रा जहागीर, पिंपळगाव, दादगाव, ब्राम्हणवाडा या सहा ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाचे सर्व उमेदवार अविरोध निवडण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतीत आता केवळ सरपंचाची निवडणूक होत आहे.

Web Title: G.P. The clear picture of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.