ग्रा.पं. सदस्यांची सुनावणी १७ ला

By admin | Published: February 25, 2017 02:25 AM2017-02-25T02:25:45+5:302017-02-25T02:25:45+5:30

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे प्रकरण.

G.P. The hearings of the members on 17 | ग्रा.पं. सदस्यांची सुनावणी १७ ला

ग्रा.पं. सदस्यांची सुनावणी १७ ला

Next

अकोला, दि. २४- ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने, जिल्हय़ातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या १५ प्रकरणात १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित प्रभागात निवडून येणार्‍या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. गत ऑगस्ट २0१५ मध्ये जिल्हय़ात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या; मात्र विहित कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या अकोला, अकोट व मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या १५ प्रकरणात १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांसमक्ष सुनावणी होणार आहे.

Web Title: G.P. The hearings of the members on 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.