ग्रा.पं. निवडणुकीचे चित्र स्पष्ट; राजकारण तापणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:29+5:302021-01-08T04:57:29+5:30
तेल्हारा तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींमध्ये ६५९ उमेदवार रिंगणात असून १६३ उमेदवारांची माघार : दोन ग्रामपंचायती अविरोध तेल्हारा : तालुक्यातील ३४ ...
तेल्हारा तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींमध्ये ६५९ उमेदवार रिंगणात असून १६३ उमेदवारांची माघार : दोन ग्रामपंचायती अविरोध तेल्हारा : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीसाठी ८२२ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १६३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ६५९ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील हिवरखेड, कार्ला, सौन्दला, गोर्धा, हिंगणी, दानापूर, खंडाळा, अडगाव, शिवाजीनगर, शीरसोली अटकली, चांगलवाडी, रायखेड, बेलखेड, वरूड बु.,घोडेगाव, रानेगाव, जस्तगाव, भांबेरी, थार, तुदगाव, वाकोडी, इसापूर, वाडी अडमपूर, वडगाव रोठे, मनब्दा, तळेगाव वडणेर, खेळदेशपांडे, वांगरगाव, अडसूळ, खेल सटवाजी, नर्सिपूर, नेर, पिवंदळ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली असून, खेल सटवाजी व चांगलवाडी या दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्याची माहिती तहसीलदार राजेश गुरव यांनी दिली. अविरोध निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.