अकोला जिल्ह्यातील २४८ शाळांना ‘ए ग्रेड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:21 PM2018-10-12T14:21:11+5:302018-10-12T14:21:20+5:30
२0१७ मध्ये झालेल्या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.
अकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शाळा स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने शाळासिद्धी उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात येते. २0१७ मध्ये झालेल्या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.
गुणवत्तापूर्ण शाळेसह त्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करता यावे, यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळासिद्धी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाळांना आॅनलाइन नोंदणी करावी लागते. ‘आयएसओ’च्या धर्तीवर राबविण्यात येणाºया या उपक्रमासाठी शाळांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्या पृष्ठभूमीवर २0१८ सप्टेंबरमध्ये शाळासिद्धी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात ए ग्रेड प्राप्त करणाºया शहरातील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. शाळासिद्धी मूल्यमापनामध्ये पातूर, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शाळा माघारल्या असल्याचे दिसून आले आहे. अकोला शहरासोबतच अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वाधिक शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
‘ए ग्रेड’ प्राप्त करणाºया शाळांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा आहेत की नाही, हे शाळासिद्धीतून स्पष्ट होते. ज्या शाळांना ‘बी ग्रेड’ मिळाला, त्यांनी ‘ए ग्रेड’ मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,
माध्यमिक/प्राथमिक
‘ए ग्रेड’ प्राप्त करणाºया शाळा
अकोला- ११८
मूर्तिजापूर- ४७
अकोट- २९
बाळापूर- १५
तेल्हारा- १२
पातूर- 0९