पदवीधरांचे रण‘जित’ !
By admin | Published: February 7, 2017 03:30 AM2017-02-07T03:30:38+5:302017-02-07T03:30:59+5:30
भाजपाचा सलग दुसरा विजय; मुख्यमंत्र्यांसह पक्षाची प्रतिष्ठा कायम
अकोला, दि. ६- वर्षभराआधीपासून मतदार नोंदणीसाठी मेहनत घेऊन केलेली मतदार नोंदणी न्यायालयाने ऐनवेळी रद्द केली, भाजपा अंतर्गत गटबाजी फोफावली, संपत्तीसह खोट्या शप थपत्रांची प्रकरणे उकरून काढण्याची मोहीम सुरू झाली, काँग्रेसने प्रथमच तगडा उमेदवार देऊन निवडणूक प्रचाराची राळ उडवली, तर काही उमेदवारांसाठी समाजाच्या नावावर म तदान जुळविण्याची खेळी सुरू झाली, अशा सर्व पृष्ठभूमीवर डॉ.रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे ह्यरणह्ण पुन्हा ह्यजितह्ण करून भाजपाला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे.
तसं पाहिलं तर, या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच डॉ. रणजित पाटील यांचे पारडे जड होते. वर्षभराआधीच डॉ.पाटील हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. पाचही जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटना, युवा मंडळे, महिलांच्या संघटना यासोबतच बुलडाणा अर्बनसारख्या पतसंस्था अन् मोठय़ा शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यास डॉ.पाटील यांनी प्राधान्य दिले. नोंदविलेला मतदार या मतदानाला जाईल इथपर्यंत या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे कधीकाळी गुपचूप होणारी ही निवडणूक प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगतदार झाली. या नियोजनाचे फळ डॉ.पाटील पर्यायाने भाजपाच्या पदरात पडले आहे.
यशाचे बाप हजार असतात, असे म्हटले जाते; परंतु या निवडणुकीत यशाचे ङ्म्रेय हे मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करणारे कार्यकर्ते अन् डॉ.पाटील यांच्या संयमी नियोजनालाच द्यावे लागेल. निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वादांवर भाष्य करून प्रकरणे वाढविण्यापेक्षा संयम अन् सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच गटबाजीचा फटका म तदानात बसल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही.
दुसरीकडे काँग्रेसने दिलेली टक्कर ही तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसने प्रथमच या मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर केला होता. संजय खोडके यांचे नेटवर्क, मॅनेजमेंट कौशल्य याचा विचार करून त्यांची निवड केली. खोडके यांनीही पाचही जिल्हे पिंजून काढत, ही निवडणूक चुरशीची केली; मात्र ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. उमेदवार हा निवडणूक लढत असतो; पण कार्यकर्तेही निवडणुकीत झोकून देतात; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ह्यनिवडणुकीसारखीह्ण लढली नाही तर या दोन्ही पार्टीचे नेते खोडके यांना बळ देण्यात कमी पडले, हे मान्यच करावे लागेल. प्रहारच्या बच्चू कडू यांनीही निवडणुकीत झोकून देत डॉ.दीपक धोटे यांच्यासाठी घेतलेली मेहनत रंग घेऊ शकली नाही अन् डॉ.अविनाश चौधरी यांच्यासाठी एकवटलेला समाजही त्यांना यशापर्यंत पोहोचवू शकला नाही. मुळातच ही निवडणूक सुशिक्षितांची निवडणूक आहे. शिक्षण क्षेत्रातील संघटनांचा बोलबाला या निवडणुकीत असायचा; पण आता तो पूर्णपणे संपला असून, ही निवडणूक शतप्रतिशत राजकीय झाली आहे, त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या निवडणुकीत घुसले, ते आता बाहेर निघणार नाही, त्यामुळे येणार्या काळात या निवडणुकीचे व निवडणुकीतील जय-पराजयाचे कवीत्व सुरूच राहणार आहे.
नाटकाचा एक अंक संपला. दूसरा आता अकोला महापालिका निवडणूक निकालानंतरच सुरू होईल. या निकालाने ज्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे; सध्या तरी भाजपाने मुख्यमंत्र्यांचा ह्यसिंहह्ण जिंकला असून महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा ह्यगडह्ण सर करण्यासाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे, यात कुणाचेही दुमत नसावे!