अकोट येथील शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:27+5:302021-07-22T04:13:27+5:30
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. गजानन पुंडकर, केशवराव मेतकर, प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट, उपप्राचार्य डॉ. एस. पी. ...
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. गजानन पुंडकर, केशवराव मेतकर, प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट, उपप्राचार्य डॉ. एस. पी. वाघ, डॉ. रवी जुमळे, डॉ. विलास तायडे, डॉ. जी. वाय. वानखडे, प्रा. यू. टी. भाटी, आजीवन सदस्य विनायकराव मोडसे, विजय हाडोळे, दिनकर बोचे, विजय घाटोळ उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. सर्वप्रथम कला शाखेतील निशा देशमुख, रेखा ठाकूर, विद्या मुरेकर, श्वेता गुप्ता, मयूरी मेतकर, रोशनी वडतकर, पदव्युत्तर विभागांमध्ये मराठी विषयात कांचन पोटे, अनुकेश उमाळे, इंग्रजी विषयामध्ये स्नेहा चितळे, निकिता सावरकर, अर्थशास्त्र विषयामध्ये अंकिता रोकडे, ज्योत्स्ना उंबरकर, इतिहास विषयामध्ये धर्मा गावंडे, दीक्षा मामनकर, तर राज्यशास्त्र विषयामध्ये राहुल चिखले, उमेश तायडे तर वाणिज्य पदवीमध्ये मनीषा वाहुरवाघ, रोहिणी काटे, अनुराधा रेळे, जयेंद्र लव्हाळे, वर्षा बोंडे, पदव्युत्तर वाणिज्यमध्ये अंकिता बोंडे, मनीषा कोहळे, बीएस्सीमध्ये आकांक्षा वानखेडे, पूनम दुबे, साक्षी कुलट, स्नेहा पोटे, गौरी मनसुटे, ए.ए.सी. रसायनशास्त्रामध्ये भाग्यश्री शित्रे, तेहरा परवीन अफसर अली, या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी सोनोने, तर आभार प्रा. स्नेहल रोडगे यांनी मानले, असे महाविद्यालयाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा. अरुण हिंगणकर यांनी कळविले आहे.