धान्याची उचल, दुकानदारांना वितरण आता ‘ऑनलाइन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:59+5:302021-03-13T04:33:59+5:30

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रक्रिया राज्यात सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये आता जिल्हानिहाय धान्याची उचल ...

Grain picks, delivery to shoppers now 'online'! | धान्याची उचल, दुकानदारांना वितरण आता ‘ऑनलाइन’!

धान्याची उचल, दुकानदारांना वितरण आता ‘ऑनलाइन’!

Next

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रक्रिया राज्यात सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये आता जिल्हानिहाय धान्याची उचल आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरणही आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्यात येणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरित करण्यासाठी जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत धान्य गोदामांमधून धान्याची उचल, तसेच तालुकानिहाय धान्याची मागणी आणि रास्तभाव दुकानदारांना धान्य वितरणाची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दहा दिवसांपूर्वी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भारतीय खाद्य निगमच्या गोदामांमधून धान्याची उचल, रास्तभाव दुकानदारांकडून धान्याची मागणी नोंदविणे, तसेच तालुकानिहाय रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने धान्याची उचल, रास्तभाव दुकानदारांकडून धान्याची मागणी व रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचे काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुरवठा साखळी व्यवस्थापनांतर्गत धान्याची उचल, रास्तभाव दुकानदारांकडून धान्याची मागणी आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

बी.यू.काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Web Title: Grain picks, delivery to shoppers now 'online'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.