ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:12 PM2018-08-11T12:12:00+5:302018-08-11T12:14:09+5:30
खामगाव : पंचायत समिती खामगावअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी २ जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती.
- योगेश फरपट
खामगाव : पंचायत समिती खामगावअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी २ जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. उमेदवारांनी अर्जही केलेत. मात्र अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली नाही. गटविकास अधिकाºयांनी सर्व अर्ज महावितरणकडे पाठवले असल्याचे कारण सांगितले.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावातील दिवाबत्तीची कामे करण्यासाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्थापक असावा. या जिल्ह्यात ८६८ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक पंचायत समितीमार्फत तालुक्यातील पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये खामगाव तालुक्यातील गणेशपूर, पिंप्री कोरडे, शिराळा, झोडगा, वझर, माटरगाव गेरु, कोन्टी, वर्णा, नांद्री, वडजी, कुंभेफळ, कवडगाव, ढोरपगाव, काळेगाव, टाकळी, हिवरा खुर्द, बोरजवळा, निपाणा, ज्ञानगंगापूर, कंझारा, भालेगाव, निमकवळा, पोरज, हिवरा बु., मांडका, रोहणा, घाणेगाव, वाकुड, पारखेड, माक्ता, राहुड, जळकाभडंग, जयपूर लांडे, खुटपूरी, गारडगाव, जनुना, जळकातेली, नागापूर, लोखंडा, घारोड, नायदेवी, किन्ही महादेव, उमरा अटाळी, पातोंडा, पिंप्रीगवळी, रामनगर, विहिगाव, आवार, निळेगाव, हिंगणा कारेगाव, अंबिकापूर, कोलोरी, पिंप्राळा, शेलोडी, पळशी खुर्द, चितोडा, कारेगाव बु, लोणीगुरव, अडगाव, बोरी, शहापूर, बोथाकाजी, कंचनपूर, आंबेटाकळी, आसा, पिंप्री धनगर, गवंढाळा, पाळा, निरोड, लाखनवाडा खुर्द, दधम, पिंप्री देशमुख, संभापूर या ग्रामपंचायतींचा समावेश होता. ही जाहिरात २ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समितीस्तरावर अर्जही आले होते. गटविकास अधिकाºयांनी अर्जाची छाननी करून संबधित अर्ज महावितरणकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे बिडिओ के.डी.शिंदे यांनी सांगितले. नियुक्तीबाबत पुढील निर्णय महावितरण प्रशासन घेणार असल्याचे ते म्हणाले.