विदर्भातील ज्येष्ठ प्रचारकांना ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर
By Atul.jaiswal | Published: November 13, 2017 03:44 PM2017-11-13T15:44:34+5:302017-11-13T15:45:27+5:30
अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुपरावजी वाघ या चार ज्येष्ठ प्रचारकांना यंदाचा ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुपरावजी वाघ या चार ज्येष्ठ प्रचारकांना यंदाचा ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकोला येथे नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नागपुर येथील जेष्ठ प्रचारक दुगार्दासजी रक्षक बालपणापासून व राष्ट्रसंताच्या सहवासातून प्रचार कार्य करीत आहेत. त्यांनी आजीवन या कार्याला वाहून घेतले आहे. ज्ञानेश्वर रक्षक यांचे ते पिताश्री आहेत. रामकृष्ण अत्रे महाराज तळेगाव परिसरामध्ये मानव सेवा आश्रम द्वारे बाल संस्कार शिबिरांच्या माध्यमातून त्यांचे अविरत कार्य करीत आहेत. अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगीता जीवन परीक्षेचे सचिव मा श्री गुलाबरवजी खवसे हे ग्रामगीता परीक्षा विभागातून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचे कार्य करीत आहेत.आजीवन प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. नागपूर येथील रुपरावजी वाघ नागपूर हे राष्ट्रसंताच्या समग्र साहित्यातून गुरुदेव सेवा करती आहेत. नवीन पुस्तके छापून अल्प दरात त्याचे वितरण करतात.
अशा या कर्मयोग्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रसंत विचार सहित्य समिती द्वारे ग्रामगीता जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, केशव दास रामटेके, सत्यपाल महाराज, आमले महाराज, तिमांडे महाराज, सुधाताई जवंजाड, मथुराबाइ नारखेडे इत्यादी विभूतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.