चोंढी येथील ग्रामपंचायतने नदीपात्रात उभारले स्मशानाचे टीनशेड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:54+5:302020-12-16T04:33:54+5:30

तक्रारीत ग्रामसेवक, संबंधित कंत्राटदाराने संगनमत करून गावची स्मशानभूमी निर्गुणा धरणाखाली असलेल्या नदीपात्रामध्ये बांधली. गावालगत शासनाची जमीन असताना, नदीपात्रात स्मशानभूमीचे ...

Gram Panchayat at Chondi erected tin shed of crematorium in river basin! | चोंढी येथील ग्रामपंचायतने नदीपात्रात उभारले स्मशानाचे टीनशेड !

चोंढी येथील ग्रामपंचायतने नदीपात्रात उभारले स्मशानाचे टीनशेड !

Next

तक्रारीत ग्रामसेवक, संबंधित कंत्राटदाराने संगनमत करून गावची स्मशानभूमी निर्गुणा धरणाखाली असलेल्या नदीपात्रामध्ये बांधली. गावालगत शासनाची जमीन असताना, नदीपात्रात स्मशानभूमीचे टीनशेड उभारण्याची गरज का भासली. ग्रामसेवकाने मनमानी कारभार करीत शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला. निर्गुणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यावर व निर्गुणा नदीला पूर आल्यानंतर स्मशानभूमी वाहून जाऊ शकते. त्यामुळे स्मशानभूमीसाठी पाच ते सहा लाख रुपयांचा शासनाच्या निधी वापरण्यात आला. निकृष्ट बांधकाम करून व नियम पायदळी तुडवून निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व संबंधित कंत्राटदार यांच्याकडून रक्कम वसूल करावी. कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे, अशी तक्रार बबन किसन पांडे यांनी केली आहे.

फोटो:

स्मशानभूमीचे टीनशेड नदीच्या पात्रात उभारले नाही. नदीच्या काठावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. बांधकामात कोणताही अपहार करण्यात आला नाही. आरोप निराधार आहे. स्मशानभूमीचे नियमानुसारच काम करण्यात आले.

बी. बी. आडे, ग्रामसेवक

Web Title: Gram Panchayat at Chondi erected tin shed of crematorium in river basin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.