Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात २०५५ जागांसाठी ४७०० उमेदवार रिंगणात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 10:34 IST2021-01-05T10:31:50+5:302021-01-05T10:34:19+5:30
Gram Panchayat Election २ हजार ७० जागांसाठी ४ हजार ७०० उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी स्पष्ट झाले.

Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात २०५५ जागांसाठी ४७०० उमेदवार रिंगणात!
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १ हजार ३१६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, ग्रामपंचायतींच्या २ हजार ७० जागांसाठी ४ हजार ७०० उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी स्पष्ट झाले. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, १८ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीत उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ हजार ९६९ उमेदवारांनी दाखल केलेले ६ हजार १६ अर्ज छाननीत वैध ठरले होते. सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामध्ये जिल्ह्यात १ हजार ३१६.उमेदवारांनी माघार घेतल्याने, जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ५५ जागांसाठी ४ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.