ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिग्गजांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:35 PM2019-06-25T13:35:59+5:302019-06-25T13:36:05+5:30
निवडणुकीत दिग्गजांना पराभव स्विकाराला लागला. अंदुरा येथे पंचायत समिती सदस्य व माजी उपसरपंच पराभूत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. २३ जून रोजी घेतलेल्या मतदानाचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत दिग्गजांना पराभव स्विकाराला लागला. अंदुरा येथे पंचायत समिती सदस्य व माजी उपसरपंच पराभूत झाले.
अकोला तालुक्यातील उगवा येथील प्रभाग क्र. ४ मधून नलिनी सत्यशील सिरसाट या २६७ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता सुमेध सिरसाट यांना २१२ मते मिळाली. सांगळूद ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.१ मधून पवनकुमार मक्कालाल जयस्वाल हे २९० मते घेऊन तर सिंधुताई देवानंद वाहुरवाघ या २९७ मते घेऊन विजयी झाल्या. सांगळूदच्या प्रभाग क्र.३ मधून प्रभाकर दौलतराव राक्षसकर (४७१) व अजाबराव फाल्गुन सिरसाट (४७५) हे विजयी झाले आहेत. अकोट तालुक्यात मूर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.१ मध्ये अमोल श्यामराव तेलमोरे हे ९७ मते घेऊन विजयी झाले. तसेच हातगाव येथील प्रभाग क्र.१ मधून संदीप शंकरराव बोळे हे विजयी झाले. त्यांना २३२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश पुंडलीकराव जोगळे यांना २१६ मते मिळाली. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे प्रभाग क्र.३ मधून सादिक अ. रफिक मन्यार (६११), सांगवी (जोमदेव) येथील प्रभाग क्र.१ योगीता महेंद्र सांगोकार (६५), प्रभाग क्र. २ इंद्रभान सांगोकार (८५) हे विजयी झाले. पारस येथे वॉर्ड क्र. १ इंदूताई श्रीकृष्ण लांडे २३२ विजयी झाले. अकोट तालुक्यातील पारळा येथील प्रभाग क्र.३ मध्ये आशा प्रमोद नगदे यांनी १५१ मते घेउन विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शोभा श्रीराम नागे यांना १०७ मते मिळाली.
शिंगोलीच्या सरपंचपदी महेंद्र बोर्डे
बाळापूर: तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महेंद्र शेषराव बोर्डे हे विजयी झाले आहेत. शिंगोली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान घेण्यात आले. तसेच २४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. सरपंच पदासाठी सरळ लढत होऊन महेंद्र बोर्डे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सरपंच मुलीधर बोर्डे यांचा ४५ मतांनी पराभव केला. महेंद्र बोर्डे यांना १६० तर मुरलीधर बोर्डे यांना ११५ मते मिळाली. सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये कृष्णाताई पंकज बोर्डे ४९, चंद्रकला शेषराव बोर्डे या विजयी झाल्या, तर प्रभाग क्र. २ पंकज शेषराव बोर्डे ५५, मंगला मुरलीधर बोर्डे ५७, प्रियंका नितेश इंगळे ६३, स्वाती संतोष बोर्डे ५७ यांनी विजय मिळवला.