ग्रामपंचायत निवडणुकीत जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:53+5:302020-12-24T04:17:53+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांचा भांबेरी गट तेल्हारा तालुक्यातील भांबेरी जि. प. गटातून विजयी झालेल्या प्रतिभा भाेजने यांच्याकडे मिनीमंत्रालयाची धुरा साेपवली ...
जिल्हा परिषद अध्यक्षांचा भांबेरी गट
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी जि. प. गटातून विजयी झालेल्या प्रतिभा भाेजने यांच्याकडे मिनीमंत्रालयाची धुरा साेपवली आहे. त्यांच्या गटामध्ये पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत आहेत, त्यामध्ये या गावांचा समाावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचा झेंडा कायम ठेवण्याची माेठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा चोंढी गट
चोंढी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आली, त्यामुळे याच मतदारसंघातील आष्टुल आणि पाष्टुल या दोन ग्रामपंचायती ताब्यात मिळवण्यासाठी कस लागणार आहे. मात्र, त्यांच्याकडे पातुर तालुक्यातील उर्वरित एकवीस ग्रामपंचायतींवरसुद्धा त्यांचे लक्ष राहणार आहे.
शिक्षण सभापतींचा कानशिवणी जि. प. गट
शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे यांच्या कानशिवणी गटातील चार ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक हाेत आहे, त्यामध्ये कानशिवणी पातुर, नंदापूर, बाेरगाव खुर्द, जवळा, बाेडखी या गावांचा समावेश आहे. पांडे गुरुजी यांच्याकडे शिक्षण व बांधकाम अशी दाेन महत्त्वाची खाती असून, त्यांचे निवडणूक व्यवस्थापन काैशल्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या गटासह त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील ग्रामपंचायतींची स्थिती कशी राहते याकडे लक्ष आहे
समाजकल्याण सभापतींचा उगवा गट
समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट यांच्या उगवा गटात तीन ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. जिल्हा परिषदेसह पक्षातही सक्रिय राहणारे आकाश सिरसाट यांना वंचितचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
सभापती मनीषा बाेर्डे यांचा कुरणखेड गट
महिला बालकल्याण सभापती मनीषा बाेर्डे यांच्या कुरणखेड गटातील
कुरणखेड, पळसाे, काेळंबी, काैलखेड जाहागीर, पैलपाडा अशा पाच ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. ग्रामीण भागातील वंचितची ताकद लक्षात घेता, या गटात त्यांची स्थिती कशी राहते हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
कृषी सभापतींचा चाेहट्टा जि. प. गट
पंजाबराव वडाळ यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या गटात सात ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या सात गावांमध्ये चाेहट्टा बाजार ही माेठी ग्रामपंचायत असून, राजकीय दृष्टीने महत्त्वाची आहे. यासह देवडा, कराेडी, जउळखेड, किनखेड, पूर्णा, नांदखेड, हनवाडी या गावांत रणधुमाळी सुरू झाली आहे.