ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मानधन कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:31+5:302021-03-22T04:16:31+5:30

अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयांप्रमाणे शासनाकडून निधी वितरित करण्यात येतो. त्यासाठी शासनाकडून अपेक्षित ...

In Gram Panchayat elections, only honorarium will be given | ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मानधन कधी मिळणार

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मानधन कधी मिळणार

Next

अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयांप्रमाणे शासनाकडून निधी वितरित करण्यात येतो. त्यासाठी शासनाकडून अपेक्षित असलेला निधीच पूर्णपणे मिळाला नाही पहिल्या टप्यात मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च भागविण्यात आला असून, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मानधन मात्र रखडलेलेच आहे

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये २ हजार ७० जागांपैकी ३२० जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने, नऊ जागा रिक्त राहिल्या हाेत्या त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले या निवडणुकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कर्तव्यापाेटी मानधनाची रक्कम निधीअभावी वितरित करता आलेली नाही

बाॅक्स

अपुरा निधी मिळाला

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ९ लाख ७६ हजार रुपये निधी शासनाकडून प्राप्त होणे अभिप्रेत आहे. एकूण निधी मागणीच्या तुलनेत यापूर्वी शासनाकडून २३ लाख १७ हजार ५०० रुपये आणि ८ जानेवारी रोजी १२ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा निधी असा एकूण निधी ३६ लाख ३ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला हाेता.

Web Title: In Gram Panchayat elections, only honorarium will be given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.