ग्रामपंचायत निवडणूक; नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:17 AM2020-12-29T04:17:29+5:302020-12-29T04:17:29+5:30

मूर्तिजापूर: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली; मात्र धोका अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या संकटात व गुलाबी थंडीत ग्रामीण भागात ...

Gram Panchayat elections; The rush of aspirants to file nominations | ग्रामपंचायत निवडणूक; नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ

ग्रामपंचायत निवडणूक; नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ

Next

मूर्तिजापूर: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली; मात्र धोका अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या संकटात व गुलाबी थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नामांकन अर्ज दि. ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवसच शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या तहसील कार्यालय व महा-ई-सेवा केंद्रात गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

मूर्तिजापूर तहसील कार्यालय आवारात ६ व उपविभागीय कार्यालय येथे २ मिळून एकूण ८ ठिकाणी नामांकन दाखल करण्याकरिता २९ ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांसाठी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट काढून स्वाक्षरी करून ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना एका प्रभागात केवळ एका जागेसाठी (आरक्षणासाठी) अर्ज दाखल करता येईल. एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवीत असल्यास) तसेच जातवैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा (राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवीत असल्यास) असा प्रस्ताव दि. ११ डिसेंबर २०२० नंतर समितीकडे सादर केलेला असावा, शौचालय वापराचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, निवडणूक खर्चाचे हिशेब सादर करण्यासाठी उघडलेल्या नवीन बँक खात्याच्या पासबुकाची छायाप्रत (जुने खाते चालणार नाही), दोन पासपोर्ट फोटो, महिलांच्या नावात बदल असल्यास दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याबाबत पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र, दि. १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीने इयत्ता सातवी पास असल्याचे प्रमाणपत्र, अशी कागदपत्रे या निवडणुकीत उमेदवारी घेणाऱ्यांना सादर करावी लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ होत असल्याचे चित्र आहे.

२४९ सदस्यपदासाठी होणार निवडणूक

मूर्तिजापूर तालुक्यात २९ ग्रामपंचायतींमध्ये ९६ प्रभागातून एकूण २४९ सदस्य निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य असलेल्या ७ ग्रामपंचायती, ७ सदस्य असलेल्या १६ ग्रामपंचायती, ११ सदस्य असलेल्या ३ ग्रामपंचायती, १३ सदस्य असलेल्या २ ग्रामपंचायती व १५ सदस्य असलेल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Web Title: Gram Panchayat elections; The rush of aspirants to file nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.