अवघ्या पाच मिनिटात ग्रामपंचायतीची सभा गुंडाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:03+5:302021-08-29T04:21:03+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील सांगोळा ग्रामपंचायतीची मासिक सभा अवघ्या पाच मिनिटात गुंडाळल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ...
खेट्री: पातूर तालुक्यातील सांगोळा ग्रामपंचायतीची मासिक सभा अवघ्या पाच मिनिटात गुंडाळल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सांगोळा ग्रामपंचायतीचे सरपंच अनंता दांदळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ ऑगस्ट रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र सरपंच व तीन सदस्यांनी मासिक सभेमध्ये हजेरी लावून हजेरी रजिस्टरवर सह्या करून निघून गेल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य उमा ज्ञानेश्वर जाधव यांनी दि. २३ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मासिक सभेत सचिव आणि तीन सदस्य हजर होते. इतर तीन सदस्य व सरपंच यांनी हजेरी रजिस्टरमध्ये सह्या करून अनुपस्थित होते. याबाबत ग्रामपंचायत सदस्य उमा ज्ञानेश्वर जाधव यांनी सचिवांना मागील दोन वर्षांचे खाते बुक, वार्षिक खर्चाचा अहवाल दाखविण्यास सांगितले असता सभेच्या अध्यक्षांना विचारा असे उत्तर सचिवांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी उमा ज्ञानेश्वर जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सचिव यांच्याशी वारंवार संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
--------
माझ्या वैयक्तिक कामामुळे सभेमध्ये मला पोहोचण्यास पंधरा ते वीस मिनिटे उशीर झाला होता. त्यामुळे आयोजित केलेली सभा तहकूब करण्यात आली होती. ती मासिक सभा पुन्हा घेण्यात येईल.
-अनंता दांदळे, सरपंच, सांगोळा
-------------------
ग्रामपंचायतीची मासिक सभा कागदोपत्री घेतली जाते, गावातील विकास कामावर चर्चा केली जात नसून, ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असल्याने गावाचा विकास खुंटला आहे.
-ज्ञानेश्वर जाधव, सांगोळा