जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:15 PM2019-08-13T14:15:01+5:302019-08-13T14:15:07+5:30
सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येते. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांची यादी अकोला पंचायत समिती गटविकास अधिकाºयांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून, विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.