ग्रामपंचायत सचिवाकडून शासन निधीचा अपहार

By admin | Published: May 21, 2014 10:20 PM2014-05-21T22:20:06+5:302014-05-21T22:50:53+5:30

पातूर तालुक्यातील बोडखा गट ग्रामपंचायतच्या तत्कालीन सचिवांनी अधिकाराचा दुरुपयोग करून शासनाच्या निधीचा अपहार केला .

Gram Panchayat Secretary | ग्रामपंचायत सचिवाकडून शासन निधीचा अपहार

ग्रामपंचायत सचिवाकडून शासन निधीचा अपहार

Next

अकोला: पातूर तालुक्यातील बोडखा येथील गट ग्रामपंचायतच्या तत्कालीन सचिवांनी अधिकाराचा दुरुपयोग करून रस्त्याच्या कामात शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप व तक्रार ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सखाराम इंगळे यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश पातूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्‍यांना दिले आहेत.
इंगळे यांच्या तक्रारीनुसार, बोडखा येथे १३ व्या वित्त आयोग २०१२-१३ अंतर्गत रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम प्रस्तावित होते. तांत्रिक मान्यता क्र. ७१५ दि. ८ मार्च १३ नुसार अंदाजपत्रकीय किमतीप्रमाणे ग्रामपंचायतकडून ३५००० रुपये प्रस्तावित केले होते. तत्कालीन सचिव देवकते यांनी रस्त्यावर मुरुम न टाकताच रक्कम काढली. त्यासाठी त्यांनी बनावट मजूर उभे करून बनावट नोंदी घेतल्या. पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया बनावट असल्याचा आरोप या तक्रारीत ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. 

Web Title: Gram Panchayat Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.