हातला-लोणाग्रा येथील ग्रामपंचायतची नळ योजना कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:50+5:302021-04-23T04:19:50+5:30
येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत अंतर्गत हातला व लोणाग्रा गावे समाविष्ट असून लोकसंख्या ९०० च्या जवळपास आहे. कारंजा रम. ...
येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत अंतर्गत हातला व लोणाग्रा गावे समाविष्ट असून लोकसंख्या ९०० च्या जवळपास आहे. कारंजा रम. नळ योजनेंतर्गत समाविष्ट असलेली ही शेवटची गावे असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीच मिळत नाही. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वतःची नळ योजना तयार करून, गावालगत शेतात बोरवेल करून गावात पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाणी क्षारयुक्त असल्याने पाण्याचा गृहोपयोगी कामात वापर होत नाही. अशातच हातला येथील शेतकरी सहदेव कसुरकार यांनी गाव शेजारी असलेल्या शेतात विहीर खोदली. सदर विहिरीला गोड पाणी लागल्यावर दोन गावातील नागरिक विहिरीतील पाण्यावर तहान भागवित आहेत. लोणाग्रा परिसर खारपाणपट्ट्यात येत असल्याने येथे ग्राम पंचायत प्रशासनाकडून आरो प्लांट उभारण्याची मागणी होत आहे.