हिवरखेड येथे हरभऱ्याचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:26+5:302021-02-16T04:20:26+5:30

शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा अडगाव: वन्य प्राण्यांनी पीक नुकसान केल्याबद्दल वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान ...

Gram production declined at Hivarkhed | हिवरखेड येथे हरभऱ्याचे उत्पादन घटले

हिवरखेड येथे हरभऱ्याचे उत्पादन घटले

Next

शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

अडगाव: वन्य प्राण्यांनी पीक नुकसान केल्याबद्दल वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत; परंतु अद्यापपर्यंत पीक नुकसानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही.

शेतांमध्ये हरभरा सोंगणीची लगबग

पिंजर: सध्या शेतांमध्ये हरभरा सोंगणीची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. शेतात मजुरांद्वारे हरभरा सोंगुन थ्रेशर मशीनद्वारे काढण्याचे काम जोरात सुरू आहे; परंतु यंदा धुके पडल्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटले आहे. यंदा कपाशीसह सर्व पिकांनी शेतकऱ्यांना दगा दिला.

बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

बोरगाव मंजू: कोरोनामुळे दहा महिन्यांपासून बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आता सुरू झाल्या आहेत; परंतु बोरगाव मंजू परिसरातील अनेक गावांमध्ये बसगाड्या सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिवहन महामंडळाने बसगाड्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव, नागरिक बेफिकीर

चोहोट्टा बाजार: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना, चोहोट्टा बाजार परिसरात नागरिक मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहेत. आठवडी बाजारात येताना, नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: Gram production declined at Hivarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.