ग्रामसभा उरल्या केवळ इतवृत्ता पुरत्याच !
By admin | Published: September 23, 2014 01:23 AM2014-09-23T01:23:57+5:302014-09-23T01:23:57+5:30
ग्रामसभेला खो : वरिष्ठांकडून अभय
अनसिंग : ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य गाभा म्हणजे ग्रामपंचायती. त्यांच्या माध्यमातुन होणार्या ग्रामसभा व त्यातील ठरावांना शासनदरबारी मोठे महत्व आहे मात्र आज या ग्रामसभा जिल्हयात केवळ इतवृत्त लिहण्यापुरत्याच उरल्याची बाब समोर येउ लागली. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्येवर उपाययोजना शासनाने ह्यग्रामसभाह्ण सुरु केली आहे. या सभेलाही पाहीजे तितके महत्व राहीलेले नाही गावातील सर्व मतदार ग्रामसभेचे सदस्य असतात. ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार २४३ ए कलमानुसार ग्रामसभेला संवैधानिक दर्जा मिळालेला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येउन गावाचा सर्वांगिन विकास करणे या उद्देशाने किमान वर्षातून सहा ग्रामसभा घेउन त्यात विकासात्मक ठराव मांडणे आवश्यक असते मात्र, अलीकडच्या काही वर्षातील ग्रामसभांचा आढावा घेतला असता ग्रामसभा मुळ उद्ेदशापासून दूर जात आहेत कागदोपत्री ठराव दाखविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ग्रामसभांना गावातील ग्रामस्थांची १५ टक्के उपस्थिती असेल तरच कोरम पुर्ण होउन ग्रामसभेचे कामकाज पुर्ण केले जाते. ग्रामसभा घ्यायची असल्यास गावात दवंडी देउन अथवा जाहीर फलकावर लिहून ग्रामस्थांना समजेल अशी त्यांची जाहीरात करावी लागते . परंतु ग्रामीण भागात आता दंवडी विसरली आहे .अनेक वर्षात ग्रामस्थांनी दंवडी ऐकली नाही .हल्ली ग्रामीण भागात अनेकजण राजकीय नेते झाले आहेत. सकाळ झाली की तालुक्याला जायचे, पोलिस ठाणे, तहसिल कार्यालय अथवा मोठया पुढार्याच्या मागे फिरणे त्यामुळे ग्रामसभेला हजेर कोण राहणार. ग्रामसभेत विशेष योजनांचा समावेश असल्यावरच गर्दी होत असतानाचे चित्र आहे दारिद्रय रेषेखालील यादी घरकुल योजना व अन्य लाभार्थ्यांंसाठी विशेष योजना असली तरच ग्रामस्थांनी आवर्जुन उपस्थिती असते. वर्षातुन सहा ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या मतदारांची सभा आहे. गावातील राजकारण बाजुला ठेवून गावाचा विकास करण्याची वेळ आली आहे आज अनेक ग्रामपंचायती मधील ग्रामसभा न होता इतवृत्त लिहले जाते आणि त्यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या घेतल्या जातात हा प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे चित्र असून संबधितांना मात्र वरिष्ठांकडून अभय दिल्या जात आहे.